अतिक्रमण काढण्यास गेलेले पालिकेचे कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांना मारहाण पोलिसांत गुन्हा दाखल
अमळनेर : विक्की जाधव
शहरातील मध्यवर्ती कोबडी बाजार भागात रस्त्याचे काम चालु असल्याने अतिक्रमण विभागातील न पा कर्मचारी राधेश्याम अग्रवाल त्याठिकाणी कर्तव्यावर असतांना दुपारी 12.30 वा. च्या सुमारास अतिक्रमण धारक जितेंद्र रजंन सांळुखे व त्याचा भाऊ दशरथ रजंन सांळुखे या दोघांनी अतिक्रमित असलेल्या आमच्या टपरीलां हात लावल्यास हातपाय तोडून टाकू अशी धमकी अग्रवाल यांना दिली मात्र अग्रवाल यांनी सांगितले की,ते माझ्या हातात नाही मला, मा. मुख्याधिकारी यानी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी काम करीत असतो, तुम्हाला हरकत असेल तर तुम्ही त्यांना भेटुन विनती करु शकतात, यावेळी ते कर्तव्य बजावत असतांना दोघांनी अग्रवाल यांना लाथाबुक्कांनी, पोटावर, पाठीवर मारहाण करून शिविगाळ केली आणि तु आमच्या टपरीला हात लावून दाखव तुला जिंवत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून जितेंद्र रजंन सांळुखे व दशरथ रजंन साळुखे विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोद करण्यात आला पुढील तपास पो.हे.कों नाना पवार करत आहे.
पालिकेचे मुख्याधिकारी यां घटनेसंदर्भात मॅनेज झाले का?? असा सवाल उपस्थिती होतोय.
पालिका कर्मचाऱ्याला मारहाण दरम्यान सदर गुन्हा दाखल न होता आपल्या माध्यमातून काही तडजोड व्हावी म्हणून माझ्यावर दबाव आणला असल्याचे न पा कर्मचारी राधेश्याम अग्रवाल यांचे म्हणणे आहे. यापूर्वी ही आदेश देणारे मुख्याधिकारी यांनी सराफ बाजार परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या प्रकरणातून राधेश्याम अग्रवाल यांना जबाबदारी सोपवून आपले हात प्रकरणातून माघारी घेतले होते.