June 29, 2025 3:12 am

‘प्रताप’ च्या चार विद्यार्थ्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सिमा सुरक्षा दलात निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘प्रताप’ च्या चार विद्यार्थ्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सिमा सुरक्षा दलात निवड

 

अमळनेर : विक्की जाधव.

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त) अंतर्गत करिअर कौंसेलिंग सेंटरचे चार विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व सिमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. चद्रभान मधुकर पाटील(CISF) दिपक जंगलू पारधी(CISF) पाटील मयूर शेखर(BSF) पाटील तेजस तुळशीदास(BSF) यांची  सर्व सीसीएमसी विभागाचे विद्यार्थी होते,त्यांनी आपली पदवी कला व विज्ञान शाखेतून घेतली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा फेब्रुवारी २०२३ रोजी झाली तर निवड-मेरीट यादी १४ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री रोजगार मेळाव्यात २३ डिसेंबर २०२४ रोजी नियुक्ती पत्र दिले जाणार आहेत,या प्रसंगी प्रधानमंत्री स्वतः उपस्थित राहतात.

या यशा बद्दल खा.शि.मंडळाचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.जयंत पटवर्धन, खा.शी.मंडळाचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार व अभिनंदन केले.

या प्रसंगी करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.धनंजय चौधरी, डॉ.माधव भुसनर,डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.हर्ष नेतकर,सीसीएमसी विभागाचे दिलीप शिरसाठ,पराग पाटील,हिमांशू गोसावी,विशाल अहिरे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!