June 29, 2025 12:47 pm

मतदार जनतेचे आभार: उमरेड मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार संजय मेश्राम यांचा आभार दौरा उत्साहात संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

मतदार जनतेचे आभार: उमरेड मतदारसंघात नवनिर्वाचित आमदार संजय मेश्राम यांचा आभार दौरा उत्साहात संपन्न

उमरेड मतदारसंघातील महालगाव, सालेभट्टी दंदे, खातखेडा, सिर्सी, आणि पिपळा या गावात उमरेड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संजय मेश्राम यांच्या भव्य आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमरेड मतदारसंघातील जनतेने संजय मेश्राम यांना भरघोस मतदानाने विजयी केल्याबद्दल त्यांनी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले. याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना संजय मेश्राम यांनी त्यांच्या विश्वासाला कायम प्रामाणिक राहून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. संपूर्ण उमरेड मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करत, जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नंदाताई नारनवरे, सरपंच सिर्सी वंदनाताई बुटे, प्रशांत राऊत, देवरावजी मेंगरे, सुनील हेडाऊ, धनराज मांगरूळकर , प्रशांत भगत, अनिल पराते, रामभाऊ भोयर, शैलेश मानकर, माधुरी घरात, राहुल गायकवाड, अश्वजीत गायकवाड, कैलाश चौधरी, केशव पुंड बालाजी दुधणकर, भास्कर उईके, गुरु देवताडे प्रशांत शंभरकर, राजपाल मेश्राम पुंडलिक वानखेडे नागेश कुंभरे मंगेश कोकाटे, शैलेश मेश्राम दिनकर वांगे बळीराम मेंढुले, भास्कर मेश्राम विनोद गौरकर, सुभाष मेंढुले, कमलाकर बरवटकर, सुभाष गिरसावडे, छाया मेश्राम मेघा मेश्राम सुनिता नगराळे मोरेश्वर घरत, कडू मसराम, कोमल मसराम, विजय भोयर जीवन राऊत विनोद मस्कर डॉक्टर दिलीप मेंगरे, विठ्ठल टिपले, विलास भुजाडे, बाबाराव देशमुख आदी मान्यवर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!