बारामतीच्या गोविंद बागेतला मोठ्या पवारांचा वाचाळवीर बीड मधे एका कार्यक्रमात स्वानंदात बरळला.
खासदार महोदय पत्रकार बांधवांचा आणि त्यांच्या बायका पोरांचा सन्मान करता येत नसेल तर राजीनामा द्या-
श्री.दादासाहेब नन्नवरे
प्रदेश सचिव तथा मराठवाडा अध्यक्ष
भाजपा कामगार मोर्चा महाराष्ट्र
एका नागरी सत्कार सोहळ्यात कौतुकाची गोड गुलाबी थाप देण्यात रंगून गेलेले बीडचे बहूरंगी खासदार अगदी अटीतटीच्या आणि जातीयवादाच्या काटसरीतून एगदी काटावर निवडून आलेले खासदार बजरंग सोनवणे आपण एका सन्मानजनक पदावर कार्य करण्यासाठी निवडून आलेले आहात आपल्याला कसलेच भान नाही,
आपल्या अस्तित्वाची आपल्याला जान नाही मोठ्या सभेच्या भाषणात जाहिरपणे सांगता मी आमदार म्हणून निवडून आलो आहे, ज्यांना स्वतःच्या पदाचा विसर पडला, एवढेच नव्हे तर खासदार साहेब तुम्हाला लोकशाहीत लोकप्रतिनीधी म्हणून जसा संविधानाने तुम्हाला दर्जा दिलेला आहे तसाच आमच्या पत्रकार बांधवांना सुद्धा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाज मान्यता दिली आहे याचा आम्ही भारतीय नागरीक आपल्याला विसर पडू देणार नाही…अविर्भावात भाषण करताना आमच्या पत्रकार बांधवाच्या कुटूंबियावर त्या आया बहिणींना मध्ये घेऊन स्वतःची वाहवा करून स्वतःच्या अस्तित्वाची जान नसणाऱ्या,वाचाळवीरा सारखी बडबड करून नाकर्तेपणाचे लेबल घेतलेल्या खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी तमाम पत्रकार बांधवाच्या कुटूंबातील आया बहिणीची जाहीर माफी मागावी.