मराठी पत्रकार परिषदेच्या ८६व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी..
प्रतिनिधी : वर्षा चव्हाण
माळेगांव ता.बारामती येथे बारामती तालुका मराठी पत्रकार संघ, आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, चिन्मय लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिराजदार यांच्या हस्ते झाले.
यावेळी मुख्याधिकारी बालाजी लोंढे, कल्याण पाचांगणे, विजय भोसले चिंतामणी क्षीरसागर, अनिता तांबे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी ३० पत्रकारांची हिमोग्लोबिन,शुगर,बिपी व इतर तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, गणेश खरात,अनिता खरात,बाबु वाघमोडे, अजित आत्तार, अनिल मदने , अशोक खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष योगेश भोसले, उपाध्यक्ष संभाजी काकडे, सचिव संदीप आढाव,वर्षा चव्हाण, दादा लोणकर, संतोष भोसले, असिफ शेख, सुनील जाधव,भारत तुपे आदी पत्रकार यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश भोसले तर आभार चिंतामणी क्षीरसागर यांनी मानले.