अनेक आरोप करत राष्ट्रवादीचे उमेदवार (शरद पवार गट ) यांचा आभार मेळावा प्रचंड नागरिकांच्या उपस्थितीत पार.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – तालुक्याचा विकास करण्यासाठी व दौंड मधील जनतेच्या सेवेसाठी सत्तेत किंवा एखाद्या पदावर असायला हवेच असे नाही. पद असो वा नसो सर्व सामान्य जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम करण्यास मी तत्पर आहे. असे जाहीर प्रांजळ मत दौंड विधान सभा निवडणुकीत तुतारीचे पराभूत उमेदवार रमेश थोरात यांनी चौफूला येथील विराट जाहीर सभेत बोलताना केले आहे.
दौंड विधान सभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे वतीने उमेदवार रमेश थोरात यांनी आज मतदारांचा आभार मेळावा केडगाव चौफुला येथील दत्त मंगल कार्यालयात आयोजित केला होता.
या मेळाव्यात मतदारांचे आभार मानताना रमेश थोरात बोलत होते
थोरात पूढे म्हणाले, दौंड ची सर्व सामान्य जनता व कार्यकर्ते हे गेल्या अनेक वर्षा पासुन मला प्रामाणीक साथ देत आली आहे. याही विधानसभा निवडणुकीत दौंड च्या जनतेने मला भक्कम साथ दिली आहे. माझा पराभव झाला असला तरी यामध्ये मला साथ देणाऱ्या जनतेचा दोष नाही. आजही आभार मेळाव्यास उत्स्फूर्त पणे प्रचंड झालेली गर्दी यांचे प्रतिक आहे, मला यांचा आंनंद आणि अभिमान वाटत आहे.
पद असो किंवा नसो मी आपली सेवा जीवाच्या अ़तिम पर्यंत करीन अशी जाहीर ग्वाही थोरात यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली आहे.
बादशहा भाई शेख आपल्या भाषणात म्हणाले, समोरचे आमदार हे विरोधी कार्यकर्ते जनतेला त्रास देण्यात धन्यता मानतात., आत्ता ते मंत्री होणार आहेत. ते मंत्री झाले की.आमचे काय होईल . हे सांगता येत नाही. अशी भिती जाहीर पणे व्यक्त केली आहे.
यूवा नेते तुषार थोरात आपल्या सडेतोड भाषणात म्हणाले, आमचा पराभव झाला असला तरी तो आम्ही मान्य करीत आहे. परंतु तालुक्यात सत्तेच्या , मस्तवाल पणाने आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास खपवून घेणार नाही. जशास तसे सडेतोड उत्तर दिले जाईल.
यावेळी तरुण कार्यकर्ते भैया चव्हाण यांनी परखड सडेतोड भाषण करुण टाळया मिळवल्या. या सभेत आप्पासाहेब पवार , शिवसेना ऊ भा टा राजन खटटी, विठ्ठल खराडे, पाराजी हंडाळ, बाळासाहेब कापरे, टेंगले , रुपनवर, श्रीमती पवार, संभाजी ताकवणे या़ची पराभवा बाबत विश्लेषण करणारी भाषणे झाली.
या सभेत पैशाचा महापूर आणि ईव्हीएम मशीन घोटाळा त्यामूळे पराभव झालयाचे भाषणातुन स्पष्टपणे पूढे आले आहे. पराभव होवुन ही आभार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड गर्दी पासुन तुतारीचा पराभव ईव्हीएम मुळेच झाल्याचे स्पष्ट मत कापरे यांनी व्यक्त केले आहे.
मलाही अनेक गोष्टी करता येतात. आम्ही संयम सोडलेला नाही. मी वकील नाही, तरीही मला त्यांना माहिती नसेल. एवढे कायद्याचे मला माहिती आहे. असे तुषार थोरात यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाटात झाला.सभेसाठी प्रचंड गर्दी होती.