बांगलादेशी हिदूवरील अत्याचार थांबवण्यासाठी बीड भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन …
बीड : बांगलादेश मधील राजकीय परिवर्तनानंतर बांगलादेशात वास्तव्य करणाऱ्या हिंदू समाजावर वारंवार अत्याचार होत असून हिंदू देवदेवतांची विटंबना केली जात आहे. हिंदू समाजातील धार्मिक स्थळे व मंदिरांवर हल्ले होत असून संपूर्ण बांगलादेश मधील हिंदू समाज भयभीत झालेला आहे . बांगलादेशातील इस्कॉनचे संत स्वामी चिन्मयानंद यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला असून अन्य संतांवर देखील गुन्हे दाखल केले जात आहेत. बांगलादेशातील संत म्हणतांना आपले धार्मिक विधी व कार्यक्रम करण्यापासून रोखले जात आहे. बांगलादेशातील हा सर्व प्रकार हिंदूंवर अन्याय करणारा असून हा अन्याय थांबवण्यासाठी भारत सरकारने भूमिका घ्यावी व बांगलादेशात वास्तव्यास असणाऱ्या हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख जिल्हा सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे ,नवनाथ शिराळे, अशोक लोढा, संगीताताई धसे ,चंद्रकांत फड ,माजलगाव चे तालुकाध्यक्ष अरुण राऊत , शांतिनाथ डोरले , लताताई राऊत ,अनिता आडगावकर, गंगुताई कुडके , सत्यनारायण उनवणे ,राजू शहाणे ,नरेश पवार, संतोष थोरात ,केशव बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे.