करमाळा (प्रतिनिधी ) :- हिंदुरूद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या विचाराचे राजकारण करून संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेना मजबूत करणार असा दावा शिवसेनेचे नूतन तालुकाप्रमुख अनिल पाटील यांनी व्यक्त केलाआनंद आश्रम मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, माजी मंत्री दादा भुसे, युवा नेते दिग्विजय बागल, तालुका संपर्कप्रमुख रवी आमले, करमाळा विधानसभा निरीक्षक अजय मोरे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र अनिल पाटील यांना देण्यात आले.
अनिल पाटील तालुक्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर असून
त्यांच्या पत्नी लता पाटील या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या
अनिल पाटील हे गेली 30 वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाचे फळ म्हणून त्यांना तालुकाप्रमुख पद मिळाले असे मत शहर प्रमुख संजय शीलवंत यांनी व्यक्त केले.
करमाळा शहर तालुक्यात अनिल पाटील यांचा दांडगा जनसंपर्क असून यावेळी युवा नेते दिग्विजय बागल यांनी अनिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या.