November 21, 2024 11:50 am

अमोल जाधव यांचा विधानसभा निवडणूक 2024 उमेदवार समर्थनार्थ सोलापूर येथे इंटक कामगार मेळावा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) सोलापूर येथे काँग्रेस- महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवार समर्थनार्थ इंटक कामगार मेळावा घेण्यात आला होता. सदर मेळावा काँग्रेस भवन सोलापूर येथे शनिवार, दि. 16/11/2024 रोजी सायंकाळी 6.00 वाजता पार पडला असून सदर मेळाव्याचे आयोजन इंटक सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले होते.

सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून व सर्व प्रमुख पाहुण्यांचे सन्मान करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंजीत गरड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमित भाटनागर यांनी पदभार सांभाळला त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण , इंटक मुंबई अध्यक्ष अमित भाटनागर, तेलंगणा आमदार इस्तर राणी यांनी काँग्रेस व इंटक चे ध्येय व धोरणे समजावून सांगितले यावेळी अमोल जाधव यांनी सांगितले की महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या विषयावर सर्व संघटनेशी व संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा केली व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत घेऊन व चर्चा करून आपण महाविकास आघाडी ला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारास भरघोस मताधिक्याने निवडणूक आनायचे काम आपल्याला करायचे आहे त्यासाठी आपन आपली संपूर्ण ताकद लावायची असे आव्हान व आदेश सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना इंटकचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी दिले

या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून इंटक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार, तेलंगणा आमदार इस्तर राणी, इंटक मुंबई अध्यक्ष अमित भाटनागर, सोलापूर नगरसेवक रियाज हुंडेकरी, काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे हे सर्व प्रमुख उपस्थिती स्थानी होते.

तसेच सोलापूर इंटक उपाध्यक्ष शिवाजी सेनसाखळे, महिला जिल्हाध्यक्ष सुजाता (ताई) वाघमारे, महिला जिल्हा उपाध्यक्ष मंगल (ताई) वाघमारे, सोलापूर जिल्हा सचिव नवनाथ काळे, जिल्हा संघटक शंकर लोभे, कोषाध्यक्ष सिद्धाराम कोळी, सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष नागसेन डुरके, सदस्य अविनाश वाघमारे, भीमराव नाळे, अविनाश मोरे, संजय अवचर, राजू सय्यद, अजीम शेख, दत्तात्रय आलाट, हर्षवर्धन अवचर, राजू गुरव, सलीम सय्यद, ज्ञानदेव कोळी, अंबादास जाधव आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!