June 29, 2025 5:09 am

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूर शहरातील महिलांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

( निलेश गायकवाड मार्मिक समाचार)

– जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी महिला सक्षमीकरणाचा नारा देत साधला इंदापूरकरांशी संवाद
महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ जिजाऊ फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे यांच्या समवेत महिलांनी पदयात्रेमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत मोठ्याधिक्याने मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करीत पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
महिलांची संख्या मोठी असून त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी देशाचे नेते शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना जनतेने साथ द्यावी यासाठी महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी होत या यात्रेमध्ये इंदापूर शहरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला तसेच यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले .
यावेळी अनेक कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाल्याने पदयात्रा मोठी होऊन इंदापुरात निवडणुकीचे मोठे वातावरण तयार झाले होते सर्वत्र तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांच्या घोषणा सर्वत्र दुमदुमत होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!