November 21, 2024 10:31 pm

१९९९ मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड २०२४ मध्ये विजयाने होणार, तालुक्यातील जनता डॉ. अनिल शिंदेना देतेय विजयाची ग्वाही

अपनी भाषा में पढ़े! Translate

१९९९ मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड २०२४ मध्ये विजयाने होणार, तालुक्यातील जनता डॉ. अनिल शिंदेना देतेय विजयाची ग्वाही,

 

अमळनेर : विक्की जाधव 

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनाच तालुक्यातील जनतेची सहानुभूती लाभत असून १९९९ मध्ये झालेल्या पराभवाची परतफेड २०२४ मध्ये भव्य विजयाने होणार असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे.

१९९९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिल शिंदे यांनी काँग्रेसकडूनच निवडणूक लढवली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. बी. एस. पाटील, जनता दलाकडून खान्देशची मुलुख मैदान तोफ गुलाबराव वामनराव पाटील हे ही रिंगणात होते. मातब्बर उमेदवार समोर असताना ही गुलाबराव पाटील यांना मागे टाकून डॉ. शिंदे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. बी. एस. पाटील विजयी झाले होते. आता २०२४ काँग्रेस पक्षाकडून डॉ. अनिल शिंदे हे पुन्हा काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवीत असून तेव्हाचे विजयी उमेदवार डॉ. बी. एस. पाटील हेच आता त्यांचा प्रचार करत आहेत. सन १९९९ मध्ये एकूण १,७३,०५० मतदार होते, व ९८,९८६ इतके मतदान झाले होते. त्यापैकी बी. एस. पाटील यांना ४९,५२३ (५०%), डॉ. अनिल शिंदे यांना २२,५२३ (२२.७५%) तर स्व. गुलाबराव पाटील यांना २१३५१ (२१.५७%) टक्के मते मिळाली होती. सद्यस्थितीत एकूण मतदारांची संख्या ३०८२७२ इतकी वाढली असून मागील विधानसभा निवडणूकीची आकडेवारी पाहता व तीन उमेदवार असल्याने ६५ हजाराच्या पुढे मते घेणारा उमेदवार विजयी होईल असा एकंदरीत अंदाज आहे. यावेळी असलेली महाविकास आघाडीची एकजूट आणि आजी माजी आमदारांविषयी असलेली नाराजी ही डॉ. अनिल शिंदे यांच्या पथ्यावर पडत असून साधा माणूस म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनता डॉ. शिंदेच्या १९९९ च्या पराभवाची परतफेड विजयाने करणार असल्याच्या मूडमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!