अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान मंत्री अनिल पाटील यांच्यामुळेच!
तर आज अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला असता, शेतकरी
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर तालुक्यासह मागील काळात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले होते. सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर झाला. मात्र अमळनेर तालुका वंचित राहिला या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसून अमळनेर तहसीलदारांना त्यावेळी निवेदन देखील देण्यात आले होते. या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करून ओला दुष्काळाच्या अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणे संदर्भात तालुक्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे गंभीर अडचणी सापडले होते. पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हातबल झाले होते, शासना कडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने मुळे विशेषतः शेजारच्या तालुक्याना मागील दुष्काळ अनुदान मिळाले असताना देखील अमळनेर तालुका या मदतीपासून वंचित राहिला होता.
दोन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीचे 54 कोटी रुपये अजूनही मदत आणि पुनर्वसन खात्यात पडलेले असून शेतकऱ्याना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांचा आरोप आहे की मदत आणि पुनर्जन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री असून देखील मंत्री अनिल पाटील यांच्या दुर्लक्षामुळे अमळनेर तालुक्याचे 150 ते 200 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या संदर्भात शासन स्तरावर ओल्या दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी शेतकरी बांधव यांच्याकडून यावेळी करण्यात आली होती.
राजकारणात मालामाल होणारे मंत्री आणि बेहाल शेतकरे हेच आजच्या जीवनाचे वास्तव आणि विदारक चित्र आहे असे रोखठोक शब्दात यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले होते.
म्हणूनच की काय मंत्री अनिल पाटील यांचे पुनर्वसन होणार नाही, असे तालुक्यातील जनता शेतकरी आश्वासित करत आहेत.