माळेगाव येथील तरुणांच्या मोठ्या गटाचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश…
बारामती ( सह – संपादक – संदिप आढाव)
.
माळेगांव शहरातील अनेक तरुणांनी शरद पवार गटाला रामराम ठोकत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणूक प्रसंगी अनेक तरुणांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहून खा.सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी मोलाची साथ दिली होती.माळेगाव शहरातील अनेक तरुणांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता.यामुळे माळेगांव येथे सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या.यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज झाले होते.
शिवनगर येथील तरुणांच्या मोठा गटा ने माजी सरपंच जयदीप तावरे, दिलिपराव तावरे यांच्या मार्गदर्शन व प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी पक्षात प्रवेश केला आहे. यामधे किरण चांदगुडे, अक्षय वदक, नंदकुमार नलगे, दत्तात्रय गरुड, संदीप वदक, आदित्य नलगे, माऊली भोईटे, प्रणव चांदगुडे, हनुमंत दडस, अभिजित पवार, सुरज तुपे, सोहम चव्हाण, पार्थ इंगळे, जय जाधव, अमित वदक, सुनिल चव्हाण, सचिन भोईटे, अजिंक्य गायकवाड, तानाजी दळवी इत्यादी तरुणांचा सहभाग होता.
विकासासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सहभागी झालो आहोत असे किरण चांदगुडे यांनी सांगितले.
