शिरीष चौधरी यांच्या प्रचारादरम्यान बंगाली फाईल, साने नगर, तांबेपुरा आणि ख्वाजा नगर, मिल चाळ,जपान जिन या भागात असंख्य नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर विधानसभा 2024 साठी वारंवार उत्साहाची प्रतिक्रिया येत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली, जनता अत्यंत कटिबद्ध आहे आणि शिरीष दादा यांच्यावर विश्वास ठेऊन विधानसभेत 100% मतदान करण्याची तयारी दर्शवीत आहे.
गोर गरिबांच्या हक्कांची रक्षण करणारे शिरीष दादा चौधरी यांचे नेतृत्व जनतेसाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे. माता भगिनींनी रस्ते सजवून रांगोळ्या टाकून शिरीष चौधरी त्यांच्यावर औक्षण केले आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा या प्रचाराच्या दौऱ्यात, शिरीष चौधरी यांच्या लोकप्रियतेची एक झलक स्पष्टपणे दिसून आली.
“जनतेचा मतदानरूपी आशीर्वाद शिरीष दादा चौधरी यांनाच असणार आहे.”
शिरीष दादांच्या मुद्द्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा, ग्रामीण विकास आणि रोजगाराच्या संधींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या जनकल्याणकारी शासकीय योजनांनी सर्वसामान्यांना मोठा फायदा झाला आहे, ज्यामुळे आज जनतेचा त्यांच्यावर विश्वास दृढ झाला आहे.