जनतेचा पाठिंबा हा शिरीष दादा चौधरी यांनाच आहे: विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

जनतेचा पाठिंबा हा शिरीष दादा चौधरी यांनाच आहे: विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे. 

 

अमळनेर : विक्की जाधव 

माजी आमदार शिरीष दादा चौधरी प्रत्येक नागरिकाच्या आवाजाची महत्त्वाची भूमिका बजावणारा नेता आहे. अमळनेर तालुक्यातील नेत्यांमध्ये, शिरीष दादा चौधरी यांचे नेतृत्व अद्वितीय आहे, तसेच त्यांच्या विरोधकांना आता भीती वाटू लागली आहे. तालुक्यातील जनतेचा शिरीष दादा चौधरी यांना जनसामान्यातून मिळणारा पाठिंबा ते पुढील आमदार होतील असे दर्शवतो. तसेच

अमळनेर शहराचा विकासाच्या संदर्भात, बोलतांना रविंद्र बापू चौधरी यांनी “चांगली बॅटिंग करण्यासाठी आपल्याला योगायोगाने बॅट हे चिन्ह मिळाले आहे.” विधानसभेचे मैदानही जवळ आहे”. आणि आपला विराट कोहली मैदान गाजवण्यासाठी देखील तयार आहे. चाट मारणाऱ्यांची जनता कशी वाट लावेल हे येत्या 23 तारखेला जनता दाखवेलचं यात शंका नाही. पुढे बोलतांना ते असे म्हणाले की, अमळनेर तालुक्यातील विकास कामांचे विश्लेषण म्हणजे अमळनेर शहरात, शाश्वत विकासाचे कोणतेही प्रभावी काम झालेले नाही. मागील काळात झोळीत पैसे जमा करणाऱ्या मंत्र्यांची प्रॉपर्टी 100% ने वाढली असून हा स्वतःचाच विकास आहे. अमळनेर तालुक्यातील शेतकरी,कष्टकरी, वंचित, महिलांच्या समस्या, अमळनेर शहरात होणारी गुन्हेगारी या गोष्टी दुपटीने वाढल्या आहेत. 

“आपल्याला सर्वांना शिरीष दादा चौधरी यांना आमदार म्हणून बघायचे आहे”. विरोधकांची भीती वाढीला लागलेली आहे, कारण जनतेच्या पाठिंब्याने अस्वस्थता त्यांच्या मनात घर करायला लागली आहे.यावेळी त्यांनी गेल्या पाच वर्षात विकास कार्ये आणि त्यांच्या पालिकेच्या कार्यकाळात वाढत्या पाणीपट्टीसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले,

यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की..

अमळनेर तालुक्यातील विकासाचा राजकीय प्रवास गहन आहे आणि मला जनतेने दिलेला पाठिंबा याची पुष्टी करतो. विरोधकांची भीती आणि कार्यकर्त्यांचे एकत्रित प्रयत्न यामुळे तालुक्यातील राजकीय दृश्य बदलत आहे. माझ्यावर असलेला जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हीच नेत्याची खरी शक्ती असते आणि अमळनेरची जनता हा बदल अनुभवण्यास सज्ज आहे. असे शिरीष चौधरी यांनी आपले मनोगत वेक्त केले.

यावेळी शहरातील अर्बन बँक चेअरमन मोहन भाऊ सातपुते, महाजन समाज अध्यक्ष मनोहर महाजन सर, मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी साहेब, मा. नगरसेवक सलिम टोपी, दादा पवार, श्रीराम चौधरी, सुरेश चौधरी, चंद्रकांत साळी, बबली पाठक, गुलाब पाटील,गोरख तात्या, नाना धनगर, रमेश देव, चंद्रकांत कंखरे, आरिफ भाया, गुलाम नबी, फिरोज पठाण, नविद शेख, पांडुरंग महाजन, भाऊसाहेब महाजन, धनु महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, दिपक चौघुले, अबु महाजन, गणेश महाजन, भरत पवार, किरण बागुल, ॲड सुरेश सोनवणे, कैलास पाटील, कैलास भील, नरेश कांबळे, महेश जाधव, अमोल भावसार, राम लखन, जयंत पाटील, अवि जाधव, प्रविण सातपुते, शुभम यादव, पराग चौधरी, मनोज शिंगाने, पंकज भोई, किशोर पाटील, संतोष पाटील, बिंदू सोनवणे, सुनिल भामरे, सुनिल भोई, विजय भोई व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!