महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसाठी राबविले प्रशिक्षण शिबिर: राजकारणात परिवर्तनाची दिशा..
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर विधानसभेत अभूतपूर्व कार्यकमाची चर्चा.. दिनांक ६ नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी चार वाजता अंबिका मंगल कार्यालय, अमळनेर येथे महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथू शिंदे यांच्या नेतृत्वात एक विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबतच, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व बुथ प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले असून येत्या काळत त्याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरात महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डॉ. अनिल नथू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहभागी सदस्यांना राजकीय योजनांची अचूक माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम म्हणजे सत्तेत येण्यासाठी आवश्यक बदलांची तयारी करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता.
डॉ. शिंदे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचे ध्येय व धोरणे स्पष्ट केली. त्यांनी उल्लेख केला की, “सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजासमोर एक सकारात्मक संदेश पोहोचवावा लागतो. तेव्हा आपण अधिक प्रभावी ठरू शकतो.” त्यांनी कार्यकर्त्यांच्या संकल्पना व विचारांची महत्त्वता अधोरेखित केली. या शिबिराद्वारे राजकारणात सामाजिक एकत्रीकरणाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकजूट साधून काम करणे आणि स्थानिक समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये ग्रासरूट स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे योगदान खूपच महत्त्वाचे आहे.
डॉ. शिंदे आजच्या राजकारणात एक नवा उमंग आणतील, अशी आशा अनेक उपस्थित व्यक्तींनी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना या प्रशिक्षणामुळे भविष्यातील राजकीय लढ्यात अधिक समर्थ बनण्याची संधी मिळालेल्या आहेत, आणि यामुळे त्यांनी एकत्र येऊन विकास दिशेने काम करण्याचा संकल्प केला आहे.