खासदार शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला…
बारामती ( सह- संपादक – संदिप आढाव)
.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खा.शरद पवार यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त करुन निषेध व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी पक्ष खा.शरद पवार यांच्या वर वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही असा इशारा दिला आहे.
शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी खा.शरद पवार यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केले आहे.या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत.राजकिय विरोध असला तरी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खा.शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचा निषेध केला आहे.
खा.शरद पवार हे राजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असुन त्यांचेवर अशी वैयक्तिक टीका टिप्पणी हे महाराष्ट्रातील संस्कृतीला शोभणारे नाही.या टिकेवरुन सदाभाऊ खोत यांना आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सामना करावा लागणार आहे.
