नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला; इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले
(बारामती पॅटर्न इंदापूर मध्ये दिसू लागला)
(निलेश गायकवाड-मार्मिक समाचार)
इंदापूर तालुक्यातील राजकीय विधानसभेचे चित्र हे दिवसेंदिवस बदलत चाललेलं दिसू लागले आहे. इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होताना पाहायला मिळत आहे. एकेकाळी एकत्र मिळून काम केलेले नेते परस्परांच्या विरोधात आता काम करताना दिसू लागले आहेत. याचा फटका आणि फायदा कोणाला होणार हे नक्कीच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी कित्येक दिवस कित्येक वर्ष हे विविध राजकीय क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील नेत्यांबरोबर काम केले आहे. तसेच त्यांच्याबरोबर काम करणारे आप्पासाहेब जगदाळे, मयूर पाटील व आणखीन मातब्बर नेते यांनी हर्षवर्धन पाटील यांना रामराम ठोकत आपली वेगळीच चूल मांडली आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यातील हेच चित्र बारामती लोकसभेला पाहायला मिळाले होते. शरद पवार यांना देखील त्यांच्याच घरातील अजित पवार यांनी देखील विरोधात आपली पत्नी यांना उभे करत शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे हिच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगनामध्ये उभे करण्यात आले होते. पण या निवडणुकीत जनतेला ते पटले नाही असे काही घडले आणि अजित पवार यांचा लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव संपूर्ण महाराष्ट्राने पहिला.म्हणजेच असेच चित्र इंदापूर तालुक्यात देखील निर्माण झाले असे चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना याचा फायदा होतो कि तोटा हे उद्या चित्रात स्पष्ट होईल…