भिगवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली
(निलेश गायकवाड)
पुणे जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह बंडखोर, अपक्षांनी प्रचाराचे नारळ फोडले. जाहीर प्रचारासाठी 13 दिवसांचा कालावधी असल्याने आता मतदारांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी नियोजन केले आहे. बैठका, जाहीर सभा, कोपरा सभांचे नियोजन करण्यात येत असून येत्या दोन दिवसांमध्ये राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे.
इंदापूर तालुक्याचे महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ भिगवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व माहितीच्या घटक पक्षांच्या वतीने प्रचाराचा नारळ शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सर्व महिला ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच आजी-माजी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिगवन परिसरामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आले आहेत. याच विकास कामांच्या जोरावरती दत्तात्रय भरणे यांना पुन्हा संधी देण्यासाठी जोरदार प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.