उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा..
विशेष प्रतिनिधी : वर्षा चव्हाण
उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सुप्रीम कोर्टानं मान्यता दिली आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आहे.
मदरशांचा मुख्य उद्देश शिक्षण देणं हाच असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. धार्मिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना रोखू शकता येणार नाही. मदरसा कायदा पूर्णपणे राज्यघटनेच्या अंतर्गत असल्याचं कोर्टांन म्हटलं आहे. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, मदाशांची मान्यता नाकारता येणार नाही असे देखील कोर्टानं म्हटलं आहे. मात्र, मदरशांमध्ये योग्य सोयी-सुविधा असाव्यात आणि शिक्षणाची काळजी घेतली जावी, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मदरसा कायदा ज्या भावनेने आणि नियमाखाली बनवण्यात आला, त्यात कोणताही दोष नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.