अमळनेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता मित्रपक्षाचे अनिल पाटील यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला घरचा आहे.
अमळनेर : विक्की जाधव
मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या तालुक्यतील जनसामान्य शेतकरी विविध संघटनेचे पदाधिकारी आणि भाजपाचे काही पदाधिकारी सक्रियपणे काम करण्यास मागे हटले आहेत. याच संदर्भात अजित पवार यांनी अमळनेर तालुक्यात २५०० कोटींची विकासकामे अमळनेर तालुक्यात झाली परंतु याचं विकासाची हकीकत काय आहे?
अशा आशयाची बातमी मार्किंग ने प्रसिद्ध केली होती. आणि त्या बातमीचे पडसाद उमटण्यास अमळनेर तालुक्यात सुरुवातही झाली आहे. अमळनेर शहरातील भाजपाचे पदाधिकारी असलेले कुंदन पाटील यांनी सोशल मीडियावर नुकताच व्हिडिओ व्हायरल करताना असे म्हटले आहे की..
जय महाराष्ट्र मित्रांनो मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पण मी महायुतीचे अमळनेर विधानसभेचे उमेदवार माननीय अनिल जी पाटील यांना मतदान करणार नाही. कारण माननीय अनिल पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकी वेळी असे वक्तव्य केले होते की
“जर कधी मी भारतीय जनता पक्ष सोडला नसता तर,””” मी आज आमदार झालो नसतो””” असे वक्तव्य माननीय आमदार अनिल भाईदास पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी केले होते.
मग जर कधी अनिल जी पाटील यांना भारतीय जनता पक्षाच्या इतका तिरस्कार असेल तर मी कुंदन पाटील अशा महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. जय श्रीराम असा अश्याचा व्हिडिओ कुंदन पाटील यांचा व्हायरल होत असून कुंदन पाटील हे भारतीय जनता पक्षाचे तरुण, एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत काम करणारी भाजपाची मोठी फळी ही आहे. परंतु अनिल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमळनेर शहरासह तालुक्यातील भाजपात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे मंत्री अनिल पाटील यांचे पुनर्वसन होण्यासाठी भाजपाचा च मोठा अडथळा आहे असे सध्याचे चित्र दिसत आहे.
मार्मिक चे सुरू होतेय युट्युब व्हिडिओ चॅनल. लवकरच.! अमळनेर तालुक्याचे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड झिरो रिपोर्टिंग अमळनेरच्या शाश्वत विकासाची गती काय. बघायला विसरू नका.