हात बदलेगा” हालात. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना मिळतोय ग्रामीण भागातून जोरदार प्रतिसाद
अमळनेर : विकी जाधव
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थु शिंदे यांनी आपल्या समर्थकांसोबत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा करीत असून या दौऱ्यात, त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर, बेरोजगारीच्या समस्यानां आणि हमीभावाच्या अभावाबद्दल चर्चा केली. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचणारा नेता म्हणजे डॉक्टर अनिल शिंदे यांच्या रूपाने ग्रामीण भागातील लोकांना मिळते मायेची ऊब..
प्रचार दौरा आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या वर जनता म्हणते एकच फॅक्टर चालणार फक्त शिंदे डॉक्टर..
डॉ. अनिल शिंदे यांनी वसंतनगर, भोलाणे, जामदा, सबगव्हाण बु, दळवेल, पिंपळभैरव, हिवरखेडा बु, हिवरखेडा तांडा, आंबापिंप्री, वडगाव, गावांमध्ये मतदारांशी संवाद साधला. या उपस्थितीत महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते होते. त्यांनी स्पष्ट केले की, “महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही.”
डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वात, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या दयनीय परिस्थिती, बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चा केली. या संदर्भात, त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “चांगल्या मतांनी मला निवडून द्या आणि सेवेची संधी द्या.” हे शब्द जनतेचा उत्साह वाढवण्यात महत्त्वपूर्ण ठरले.
“जनता बोले परिवर्तन!” हे वाक्य आता अमळनेर विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वाचे सूचक ठरले आहे. डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात, सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत असून, या मतदारसंघातील परिवर्तन निश्चित आहे, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, “हाथ बदलेगा हालात,” म्हणजेच लोकशाहीच्या माध्यमातून बदल साधला जाईल.