मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघातील धाबे,तांबोळी आणि हिरापूर रस्ता टक्केवारीने झाला बेहाल सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम
अमळनेर : विक्की जाधव
विकास आणि जीवनशैलीच्या उन्नतीच्या दृष्टीने समर्पित असलेल्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात धाबे, तांबोळी आणि हिरापूर हा रस्ता एक अद्वितीय उदाहरण ठरलेला आहे. नुकतीच त्याठिकाणी प्रचारासाठी गेल्यावर सामाजिक कार्यकर्ते आनंद निकम आणि माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांनी हा रस्ता इतका सुरेख व सुंदर आहे की आपल्याला त्याचे चित्रण करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. परंतु आता प्रश्न असा आहे की, या रस्त्यावरून जाणारे लोक कसे जात असतील? हे विचारताना, ह्या भागातील शाश्वत विकासाच्या दाव्यावर चर्चा करताना गावातील स्थानिक नागरिकांनी गेल्या पाच वर्षात शास्वत विकासाच्या नावावर निव्वळ गप्पा आणि बॅनर वर फोटो लावणाऱ्या मंत्री महोदयांनी आमच्या गावाकडे पाठ फिरवली असून येत्या विधानसभेत संपूर्ण गाव देखील त्यांच्याकडे पाठ फिरवेल अशी ग्वाही दिली.
धाबे ते हिरापूर हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरून जनतेची वर्दळ नेहमीच असते. लोकांना या रस्त्याचे लाभ होत असले तरी, आमच्या नेत्यांनी केलेल्या विकासाच्या वलयात अनेक शंका उपस्थित होत आहेत. मंत्री अनिल पाटील यांचा मतदारसंघ म्हणून ह्या गावांचा शाश्वत विकास झालेलाच नाही. नागरिक
पण, प्रश्न असा आहे की या ‘विकास’ शब्दाचा खरा अर्थ काय आहे? आम्ही अनुभवलेल्या विकासास वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, हा विकास मुडदूस विकास म्हणून ओळखला जातो. जो फक्त टक्केवारीच्या प्रमाणात वाढतो, परंतु त्या वाढीमध्ये ठोस कामकाज केवळ कागदावरच आहे. असे सामाजिक कार्यकर्ते आनंत निकम यांनी सांगितले.
मतदान करताना हे विचारणे अपेक्षित आहे की, हे शाश्वत विकासाचे दावे सत्य आहेत का? मतदानाच्या प्रक्रियेत, आपण सर्वांनी विचारपूर्वक मतदान करणे आवश्यक आहे, कारण आपल्यात एक एक मत परिवर्तनाची ताकद आहे. सचिन बाळू पाटील