June 29, 2025 8:08 am

अमळनेर येथे बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने बलिप्रतिनिमित्त सालाबाद प्रमाणे महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक अमळनेर शहरातून काढण्यात आली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर येथे बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने बलिप्रतिनिमित्त सालाबाद प्रमाणे महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक अमळनेर शहरातून काढण्यात आली.

 

अमळनेर : विक्की जाधव 

शिरूर नाका परिसरातील जय अंबे मित्र मंडळ चौकात महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेसन छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सजवलेल्या बैलगाडीवर भव्य मोठे असे लाकडी नांगर आणि महात्मा बळीराजाची भव्य प्रतिमा ठेवलेली होती. बैलगाडी पुढे बँडची गाडी आणि विविध सामाजिक चळवळीमधील प्रमुख कार्यकर्ते व महिला युवक चालत होते. चौका चौकात महिलांनी बळीराजाचे व नांगराचे पूजन केले. इडा पिडा टळो ! बळीचं राज्य येवो ! अशा घोषणांसह विविध शेतकरी गीतांनी सदर मिरवणूक शिरूर नाका परिसर वड चौक वाघ बिल्डिंग त्रिकोणी बगीचा पाचपावली देवी मंदिर बस स्टॅन्ड विश्रामगृहमार्गे बळीराजा स्मारक पर्यंत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघाले. बळीराजा स्मारक येथे सदर मिरवणुकीचा समारोप बळीराजाच्या शिल्पास भव्य पुष्पा पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. सुभाष पाटील यांनी शिवकालीन काठीचे कर्तब ताशांच्या गजरात दाखविले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शेतकरी व कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या नांगराची पूजा ही करण्यात आली.

सदर मिरवणुकीत ठिकठिकाणी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी शेतकरी गीते गायलीत.जिजाऊ वंदना अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे यांनी गायली तर मिरवणुकीचे सूत्रसंचालन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुढापा व सप्तशृंगी , शिवकॉलनी मित्रपरिवार सोबत मराठा सेवा संघ , संभाजी बिग्रेड , जिजाऊ ब्रिग्रेडचे कैलास पाटील,दिलीप बाळू पाटील, बाळू पाटील , प्रेमराज पवारसर , रवि पाटील , सुनिल मराठे , शिवाजी पाटील , नवल पाटील , मधू पाटील , गुलाब पाटील , अमृत पाटील कुलदिप पाटील अमोल पाटील , संजय पाटकरी , प्रमोद पाटकरी , संजय पाटील अनिल शेटे , प्रदिप पाटील , भरत आबा आदिंसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!