June 30, 2025 12:14 pm

जनतेचा आवाज तोच जुना अपक्ष पॅटर्न: शिरीष दादा रिटर्न –

अपनी भाषा में पढ़े! Translate

जनतेचा आवाज तोच जुना अपक्ष पॅटर्न: शिरीष दादा रिटर्न – अमळनेर विधानसभा २०२४

अमळनेर : विक्की जाधव

विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांची प्रचाराची रंधुमाळी सुरू झाली आहे. मागील काळात त्यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या प्रवासाची आठवण जागवणारे या निवडणुकीचे स्वागत करत आहेत जनतेचा आवाज तोच जुना अपक्ष पॅटर्न: शिरीष दादा रिटर्न असे शहरातील गल्लोगल्ली शिरीष दादा चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या प्रचार मोहिमांना सुरवात केली आहे. तालुक्यासह अमळनेर शहरात त्यांच्या समर्थनात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल झालेल्या झामी चौक, शिरूड नाका, श्रीराम कॉलनी, शारदा कॉलनी, विद्या विहार कॉलनी, सुरभी कॉलनी, आर के नगर, पान खिडकी, वाडी चौक, सराफ बाजार, कसाली, भोईवाडा आणि माळीवाडा या परिसरामध्ये प्रचारादरम्यान सर्वत्र शिरीष दादा यांचे स्वागत करण्यात आले.

शिरीष दादा चौधरी यांनी आपल्या प्रचारादरम्यान “सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा माझा विश्वास आहे.”

स्थानिक समस्यांची चर्चा करून त्या समस्यांचे समाधान आपल्या कडे आहे, स्थानिक विकासासाठी शिरीष चौधरीचां वेळोवेळी प्रयत्न राहिलेला आहे. मा. आ. शिरीष चौधरी

शिरीष दादा यांचा प्रवास हा केवळ एका राजकारणीचा नाही, तर एक जनसेवक म्हणून जनतेच्या हृदयात स्थान मिळविण्याचा आहे. त्यांच्या या प्रयत्नांनी अजून एकदा स्पष्ट झालं आहे की, आमदार पदाच्या कर्तव्यांची कसोटी जनतेच्या प्रतिक्रीयेवर असते.
जनतेतून मिळणारा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची साथ यामुळे ते अमळनेर विधानसभेचे आमदार होतील यात शंका नाही आता संपूर्ण जनतेची अपेक्षा आहे की, या निवडणुकीत शिरीष दादा चौधरी यांचा विजय निश्चित करावा लागेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!