करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- वंचित बहुजन युवा आघाडीचे सोलापूर जिल्हा माढा विभाग जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे यांच्यासह तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष यांचेसह जिल्हा पदाधिकारी यांनी जिल्हा प्रभारी यांच्या एकाधिकार भुमिका कंटाळून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्ष वाघमारे यांच्या राजीनाम्याने वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, युवा आघाडीला कोणत्याही प्रकारची विचारणा न करता तथा विश्वासात न घेता जिल्हा प्रभारी निर्णय घेत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारच निर्णय क्षमतेचा अधिकार नाही तसेच लोकसभा विधानसभा निवडणुकीतही वरिष्ठांकडून युवा पदाधिकारी यांची हेळसांड झालेली आहे. आम्ही तळगळापासून पक्ष बांधणी करायची आणि जिल्हा प्रभारी यांनी परस्पर निर्णय घेऊन आम्हाला अडचणीत आणण्याची रणनीती आखत असतात. पॅरेन कमिटीवर जिल्हा पदाधिकारी यांनी जीव घेणा हल्ला केला होता त्यांची पाठराखण जिल्हा प्रभारी यांच्याकडून झाली. सोलापूर जिल्हात मी पक्षाची ताकद निर्माण करून गाव तिथे शाखा सुरू केल्या शेकडो कार्यकर्ते जोडले. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारत योग्य तर्हेने सांभाळून पक्ष वाढ केली. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पक्षाला हानी होत असताना आम्ही शांत बसण्यापेक्षा राजीनामे देऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्ते म्हणुन काम करत राहू असेही यावेळी वाघमारे यांनी सांगितले.