अमळनेरच्या जनतेला मा. आ. शिरीष दादा चौधरीचं का हवा ?
आमदार अस्थांनी त्यांनी केलेल्या कामाचा मार्मिक ने घेतला थोडक्यात आढावा
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनता, युवक, मित्र, माता भगिनीनो मी शिरीष चौधरी अमळनेर विधानसभा मतदारसंघात २८ रोजी नामांकन पत्र भरत असून आपला मतदानरुपी आशीर्वाद द्यावा ही विनंती.
प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो. सप्रेम नमस्कार आपणास माहिती आहे कि सन २०१२ पासुन तुम्ही मला जे प्रेम आशीर्वाद आणि विश्वास दिला त्या जोरावरच मी कायम उभा आहे. तुमचा विश्वास, तुमचा सन्मान, तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. गेल्या बारा वर्षापासुन मी मतदार संघाचा सेवेसाठी सदैव तत्पर असून शहराचा सर्वांगीण विकासासाठी विविध माध्यामातून तथा प्रसंगी स्वखर्चाने माय बाप जनतेचे हित जोपासण्याचे प्रामाणिक पणे माझे कर्तव्य पार पाडत आहे.
अमळनेर शहराला सदैव प्रेरणादाई ठरेल असे
आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे शहराला मुख्य प्रवेशद्वार, संत सखाराम महाराज वाडी येथे भक्त निवास, नविन पोलीस वसाहत, नगरपरिषद इमारत, सुसज्ज असे नाट्यमंदिर, विविध भागात सौर हायमस्ट लाईट, शहराला पाणी टंचाई भासू नये म्हणुन कलाली डोह योजना तथा जीर्ण पाणीपुरवठा व्यवस्था नुतनीकरण करुन कार्यान्वित करुन दहादिवसाआड येणारे पाणी दोन दिवसाआड सुरुळीत केले. शहरात चोपडा रोड स्मशानभूमी नुतनीकरण, खळेश्वर येथील सुसज्ज स्मशानभूमी, मागासवर्गीय मलींचे वसतिगृह, भाजीपाला मार्केट भव्य लिलाव शेडनिर्माण केले. इ पबच्या माध्यामतून रोजगार उपलब्ध केले, चोपडा रस्त्यावर चौपदरी रेल्वे उड्डानपूल, ढेकू रोड येथे सुंदर असे भक्ती शक्ती स्मारकासाठी निधी उपलब्ध केला. तसेच दिव्यांग बांधवांसाठी सायकल व साहित्य वाटप, शहराला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते उच्च दर्जाचे कॉक्रीटकरण केले, शहरात विविध भागात कधी न झालेले असे उच्च प्रतीचे रस्ते निर्माण केले तसेच शहरातील खुले भूखंड सुशोभिकरण केले. त्याचप्रमाणे शहरातील न.पा. व्यापारी संकुलातील वाढलेली जाचक भाडेवाढ समोपचाराने रद्द करण्यासाठी बैठक घेवून निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडून व्यापारी हित साधले. तसेच वेळोवेळी शहरवासीयांवर विविध कर लादण्याचा प्रयत्न होत असतांना त्यास प्रखर विरोध करुन स्थगिती मिळवली. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात हवालदिल शहरवासियांसाठी स्व खर्चाने पूर्ण शहर निर्जंतुकीकरण केले. घरात बसून नाही तर जनतेत जाऊन काम केले. कोरोना काळात औषधी, इंजेक्शन मिळणे कठीण होती ते अल्प दरात उपलब्ध करून कायद्याची तमा न बाळगता प्रसंगी माझा माय बाप जनतेचा जीव वाचवण्यासाठी अंगावर गुन्हे घेत न डगमगता शेकडो रुग्णाचे प्राण वाचवले.
मी शिरीष चौधरी असे एक ना अनेक स्तरावर मायबाप जनतेसाठी प्रामाणिक पणे काम करत आहे. येणाऱ्या काळात देखील आपल्या अमळनेर चे नाव स्वभिमानी अमळनेर सुंदर अमळनेर… करमुक्त अमळनेर… भयमुक्त अमळनेर करुन शहराच्या शाश्वत विकासासाठी मी कटिबद्ध राहील.