June 29, 2025 11:21 pm

अमळनेरच्या प्रगतीसाठी आपल्या अमळनेरला न्याय देणारा आणि जनतेशी जोडलेलं नेतृत्व निवडण्यासाठी उद्या या’ शिरीष चौधरीचं नामांकन भरण्यासाठी

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेरच्या प्रगतीसाठी आपल्या अमळनेरला न्याय देणारा आणि जनतेशी जोडलेलं नेतृत्व निवडण्यासाठी, शिरीषदादांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील मतदार राजाला उद्या उपस्थित राहण्याचे आव्हान.. गुलाबराव पाटील 

 

उद्या सकाळी संत सखाराम महाराज वाडी संस्थान वाडी चौक येथून होणार भव्य मिरवणुकीची सुरुवात

 

अमळनेर : विक्की जाधव.

“परिवर्तनासाठीचा एक निर्धार, भविष्य घडवण्यासाठीचा एक स्वप्न, आणि जनतेच्या मनातला एकच आवाज… शिरीषदादा चौधरी! 

भव्य रॅलीत सामील होण्यासाठी चला, एकत्र येऊया.. अमळनेर विधानसभेत इतिहास घडवूया..

उद्या. सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ वेळ : सकाळी ९:३० वा.  स्थळ:संत सखाराम महाराज मंदिर, वाडी चौक येथुन तत्पूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे मोठे बंधू रवींद्र बापू चौधरी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण करून पुढे साने गुरुजी पुतळा येथे देखील पुष्पहार अर्पण करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाडी चौका येथून मा. आ. शिरीष चौधरी यांची नामांकन भरण्यासाठी भव्य अशी रॅली निघेल.

आपली साथ, आपला विश्वास आणि आपलं समर्थन हा बदल घडवण्यासाठीचं बळ आहे. चला, परिवर्तनाच्या लाटेत सामील होऊ या.. यासाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी, कष्टकरी, शिक्षक, व्यापारी, नोकरदार, आणि समस्त बहुजन समाजाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवावी असे आव्हान गुलाब पाटील, शिरीष दादा चौधरी मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!