अमळनेर मतदार संघाचे महायुतीचे उमेवार मंत्री अनिल पाटील २४ ला भरणार आपला उमेदवारी अर्ज
अमळनेर : विक्की जाधव
पाच वर्ष आमदारकीची सत्ता भोगून मंत्री अन् अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज 24 ऑक्टोबर रोजी दाखल करणार असल्याने समजते संपूर्ण तालुक्यात विकास दौरे करून प्रत्येक गटाच्य प्रमुखांच्या भेटी घेऊन शाश्वत विकास आणि पडळसरे धरणाचा मुद्द्यावर शहरात आणि तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांच्या मुद्द्यावर मंत्री अनिल पाटील येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून साहजिकच त्यांचे पारडे जळ असणार असून. समोर देखील तगडे उमेदवार म्हणून माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि संभाव्य उमेदवार माजी आमदार कृषीभूषण साहेबराव दादा पाटील, डॉक्टर अनिल नथू शिंदे. यांच्यात चौरंगी लढत होण्याची तालुक्यात दाट शक्यता आहे.
एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवशी दुपारी ३:०० वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे ए बी फॉर्म मूळ शाहीच्या स्वाक्षरीत असावा उमेदवाराने फॉर्म भरताना येथे वेळी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी केले आहे.