November 21, 2024 11:00 am

प्रताप नगर स्वामी भक्तासाठी आनंदाची बातमी

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप नगर स्वामी भक्तासाठी आनंदाची बातमी महापालिका ठराव करणार लोकप्रतिनिधींनी दिली माहिती 

मार्मिक न्यूज नेटवर्क 

शहरातील प्रतापनगरात असलेल्या केंद्राचे असलेल्या अतिक्रमणाच्या विषयासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका अर्जदारांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मागे घेतली. न्यायालयाने या विषयीची विनंती मान्य केल्यानंतर ही याचिका निकाली निघाली असल्याची माहिती अॅड. सुशील अत्रे यांनी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रतापनगर परिसरात असलेल्या केंद्राच्या अतिक्रमणाविषयी परिसरातील नागरिकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावरून शुक्रवारी रात्री या परिसरातील रहिवासी अॅड. सुशील अत्रे यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी आकाशवाणी चौकात सेवेकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी दुसरीकडे या विषयासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याची ग्वाही प्रतापनगर परिसरातील रहिवाशांच्यावतीने अॅड. सुशील अत्रे यांनी दिली होती. त्यानुसार सोमवार दि. २१ ऑक्टोबर रोजी खंडपीठात अॅड. अत्रे यांनी रहिवाशांच्यावतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून याचिका मागे घेतली. त्यामुळे आता अवमान याचिका निकाली निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसापर्वी सेवेकरी आले होते रस्त्यावर 

स्वामी समर्थांच्या केंद्रावर बुलडोझर चालवल्यामुळे संतप्त सेवेकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेतली आणि रविवारी रास्ता रोको केला. संतप्त सेवेकऱ्यांनी इतर अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचेही यावेळी सांगितले. तसेच, संबंधित वकिलाने तक्रार मागे घ्यावी तसेच अतिक्रमणाची कारवाई करू नये. स्वामी समर्थ केंद्राच्या जागेचा महापालिकेत ठराव करून ती जागा केंद्राला देण्यात यावी अशा मागण्या यावेळी या आंदोलनात सेवेकरांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी आमदार, महापौर यांनीही सेवेकऱ्यांना पाठिंबा दिला होता.

अखेर संबंधित वकिलाने व्हिडिओ कॉल करून कोर्टात केलेली तक्रार मागे घेण्याचा आश्वासन दिल्यानंतर तसेच महापालिकेत ठराव करून जागा केंद्राला देण्याचा प्रशासनाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

केंद्रातील सेवेकऱ्यांनी अॅड. अत्रे यांना भेटून विनंती केली होती. मात्र त्यांनी तक्रार मागे न घेतल्याने केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. हा निर्णय यापुर्वी घेतला असता तर मनःस्ताप टळला असता, असे केंद्राचे अध्यक्ष बी.एन. पाटील यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!