November 21, 2024 5:33 pm

माजी आमदार शिरीष चौधरी २९ रोजी भरणार विधानसभेचा उमेदवारी अर्ज

अपनी भाषा में पढ़े! Translate

माजी आमदार शिरीष चौधरी २९ रोजी भरणार विधानसभेचा उमेदवारी अर्ज

 

अमळनेर : विक्की जाधव

विधानसभा निवडणूक जवळ आलेली असून निवडणुकीची घोडदौड सुरू झाली असून माजी आमदार शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार जोरदार कामाला लागला असून मित्र परिवाराचे मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. विविध गटांचा मेळावा घेऊन माजी आमदार शिरीष दादा चौधरी आणि त्यांचे मोठे बंधू हिरा उद्योग समूहाचे चेअरमन रविंद्र बापू चौधरी यांची विरोधकांच्या कामकाजावर बोट ठेवत मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी करून अमळनेर तालुका विकासाच्या दृष्टीने किती मागे आहे, हे मतदारांना जाणीव करून देत विविध गटांच्या मेळाव्यात जणू चौधरी बंधू षटकार मारत आहे.

 

शिरीष दादांना २०२४ मध्ये पुन्हा आमदार का करायला हवं. व्हिडिओ होतोय व्हायरल..

शिरीष दादा चौधरी गोरगरिबांचे खरे आमदार आहेत असे जनसामान्यात वारंवार बोलले जाते.

नुकतीच सोशल मीडियावर त्यांचा कोविड काळातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या कार्याचा साक्षीदार आहे जिथे त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांना मदत करण्यासाठी स्वतःची गाडी खोल पाण्यात घातली, जिथे कोणीही पोहोचू शकत नव्हतं, तिथे माजी आमदार शिरीष चौधरी पोहोचले आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांसाठी ते केव्हाही तत्पर असून ते वेळोवेळी मदतीला धावून येणारे आमदार आहेत आणि अर्ध्या रात्रीतही फोन उचलणारे आमदार आहेत. असे व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे.

माजी आमदार शिरीष चौधरी आमदार होण्यासाठी पात्र का आहेत. ते नेहमीच गोरगरिबांच्या आणि जनतेचा पाठीशी असणारे, मदत करणारे, आणि समाजासाठी तत्पर असलेले नेते आहेत. असे जनतेतून वेळोवेळी बोलले जाते येत्या विधानसभेच्या उमेदवारी अर्ज ते २९ रोजी भरणार असून मोठ्या जनसमुदायाने श्री दादा चौधरी यांना पाठिंबा द्यावा असे रवींद्र बापू यांनी मार्मिकशी बोलताना सांगितले

.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!