इंदापूर तालुक्यातील जनताच विकास करणाऱ्या माणसाला निवडून देईल आमदार दत्तामामा भरणे.
पिंपरी बुद्रुक:
दिनांक: 19/10/2024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे यांची मुलाखत घेतली त्यावेळेस त्यांना भीमराव दादा कडाळे पाटील यांनी प्रश्न विचारला की गेले दहा वर्षे कुठलाही विकास झालेला नाही?असे विरोधक म्हणतात त्यावेळेस दत्तामामा भरणे म्हणाले ,की विकास हा इंदापूर मध्ये झाला आहे का नाही? हे प्रत्येक जनतेला आणि प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. इंदापूर तालुक्यामध्ये रस्ते हे निकृष्ट दर्जाचे झाले, हो निकृष्ट दर्जाचे झाले पण जे झेडपी चे रस्ते असतात ते कमी बजेटचे असतात व ते थोडेफार कॉन्ट्रॅक्टर ही विचित्र असतात त्याच्यामुळे निकृष्ट होतात. पण रस्ते झाले म्हणून ते निकृष्ट झाले.रस्ते झाले म्हणून त्यात खड्डे झाले. विरोधकांनी आत्तापर्यंत रस्तेही केले नाही त्याच्यामुळे निकृष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही आणि पुढे दत्त मामा भरणे म्हणाले की ज्या झाडाला फळ येत त्या झाडाला दगडे मारली जातात. ज्या झाडाला फळ येत नाही त्याला कोणीही दगड मारत नाही. जो कोणी विकास करेल त्याच्याविषयीच बोलले जाते जो विकास करत नाही त्याच्याविषयी बोलायला काहीच शिल्लक राहत नाही आणि मी प्रामाणिकपणे इंदापूरची सेवा केलेली आहे त्यामुळे जनतेला खरे काय ते माहिती आहे. इंदापूर तालुक्यात एवढा मोठा विकास केला आहे आणि लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना संभ्रम निर्माण करण्यासाठी असे विरोधक आरोप- प्रत्यारोप करत असतात. पण आपण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न देता प्रामाणिकपणे काम करत राहणार आहोत.
तसेच 2019 ते 2024 पर्यंत इंदापूर तालुक्यासाठी 6000 कोटीचा निधी आणलेला आहे आणि त्याची माहिती प्रत्येक गावात जनतेपर्यंत पोहोचवलेली आहे. मी या तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी , मुस्लिम जनतेसाठी, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्याची सोय त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी विज बिल माफ केले. त्याचप्रमाणे भगिनींसाठी तीन सिलेंडर गॅस मोफत केले, मुलींना शिक्षण मोफत केलेले आहे. हे सर्व आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या तसेच आदरणीय अजित दादा पवार यांच्या मदतीने केलेले आहे.
आचारसंहितेच्या शेवटच्या दिवशीही इंदापूर नगरपालिकेला 16 कोटी रुपये निधी दिलेला आहे. जंक्शन येथील एमआयडीसी चा ऐतिहासिक निर्णय घेऊन येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे व तेही मंजूर करून आणलेले आहे. जंक्शन ची एमआयडीसी ही सर्वात मोठी एमआयडीसी ठरणार आहे.