मागासवर्गीय, गोरगरीब लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची सवय तालुक्यात मीच लावली- लाडके आमदार दत्ता मामा भरणे.
पिंपरी बुद्रुक:
दिनांक -19/102024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
इंदापूर तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची सवय इंदापूर तालुक्याला मीच लावली असं वक्तव्य दत्तामामा भरणे यांनी केले.
गेल्या दहा वर्षांपूर्वी कुठलाही नेता किंवा विरोधक हे गोरगरीब किंवा मागासवर्गीयांच्या घरी कार्यक्रमासाठी जात नव्हते. ज्यावेळेस मी आमदार झालो तेव्हा गोरगरीब मागासवर्गीयांची घरे या सर्वांना दिसायला लागली आणि त्याची सवय मीच लावलेली आहे.
भीमराव दादा कडाळे पाटील यांनी अंकिता पाटील यांच्या विषयी विचारले असता ते म्हणाले, की अंकिता पाटील ह्या माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत त्यांच्याविषयी बोलणे हे चुकीचे ठरेल. त्यांच्या वडिलांची अन आमची ही राजकीय लढाई आहे. त्यामुळे त्या काही बोलल्या आणि काय नाही बोलल्या याला मी जास्त महत्व देत नाही. इंदापूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे की आमचे कुटुंब काय होते आणि पाटलांचे कुटुंब काय होते. चार कोटी ची गाडी मी घेतलेले नाही आणि माझा जन्म हा बंगल्यात झालेला आहे. त्याच्यामुळे बंगला, गाड्या या गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मी एवढा मोठा निधी आणलेला आहे आणि जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे . त्याच्यामुळे ह्यांना कुठलाही मुद्दा नसल्यामुळे हे माझ्यावरती आरोप करत आहेत असे ते म्हणाले.
विरोधकांनी काही म्हटले तरी इंदापुरातील जनतेला माहिती आहे की भरणे कुटुंब काय आहे पहिल्यापासूनच माझ्याकडे सर्व काही आहे त्यामुळे बंगले नवीन गाड्या मी भरपूर घेऊ शकतो. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी मी त्याच्याकडे लक्ष देत नाही फक्त इंदापूर तालुक्याच्या विकासाकडेच माझे लक्ष असणार आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना माहिती आहे की त्यांना उसाच्या बाबतीत त्रास कोणी दिलेला आहे. यांनी कारखानेच खाजगी ठेवलेला आहे हे सभासद कोणालाही करून घेत नाहीत. त्याच्यामुळे यांचे 90% सभासद आणि बाकीचे दहा टक्के सभासद असल्यामुळे निवडणूक ते जिंकतात आणि हे नावाला सहकरी कारखाने आहेत. पण यांचे कारखाने हे खाजगीच आहेत. कैलासवासी शंकरराव भाऊ आणि कैलासवासी गोकुळ शेठ शाहा हे आमच्यासाठी आदरणीय राहणार आहेत आणि त्यांचे कार्य हे खूप चांगले होते .त्यांच्यासारखे कार्य पुढे कोणालाही करता येणार नाही.