June 29, 2025 12:34 pm

कार्यक्रम युवा संवाद मेळावा आणि स्टेजवर फक्त तीन युवा??

अपनी भाषा में पढ़े! Translate

कार्यक्रम युवा संवाद मेळावा आणि स्टेजवर फक्त तीन युवा??

 

अमळनेर : विक्की जाधव.

महाराष्ट्रात मान्सून जरी गेला असला तरी विधानसभेचा मान्सून यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे वारे सुरू झाले असून अमळनेर विधानसभा क्षेत्रात यावेळी निवडणूक चांगलीच रंगणार असे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला असून 26 नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपणार असून सर्वच राजकीय नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) च्या इच्छुक उमेदवारांनी नुकतीच शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे युवा संवाद कार्यक्रमा आयोजित केला होता. यावेळी स्टेजवर युवा कमी आणि दुसरीच मंडळी खुर्च्या गरम करत होते. कार्यक्रमासाठी पैसे देऊन गर्दी जमा करण्याचा खेळ अमळनेरकरांना यांना जुना नाही, तरी कार्यक्रमास पाहिजे तेवढी गर्दी झाली नव्हती. आमदारकीचे स्वप्न बघणाऱ्या इच्छुक उमेदवारांना आपण निवडून येण्याची शाश्वती ही नाही. निव्वळ पैशाचा अपव्यय करून पैसा खर्च करून गर्दी जमा करून सामान्य जनतेची दिशाभूल करून जणू आजच निवडणुकझाली तर आम्ही जिंकलो असे इच्छुक उमेदवार दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

यावेळी बोलताना 

“आम्ही निष्ठावंत” “आम्ही निष्ठावंत” म्हणून स्वतःची वाजून घेणारे एका पक्षासाठी काम करणारे परंतु एकमेकांच्या विरोधात तुतारी फुगणार?? तुम्ही निष्ठावंत तर दुसरे कोण विस्टावंत?? असे एकाने मार्मिक शी बोलून दाखवले. 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!