प्रतापच्या इतिहास विभागाचा साने गुरुजी ग्रंथालयाशी सामंजस्य करार…
अमळनेर : विक्की जाधव.
खानदेश शिक्षण मंडळ मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि संशोधन केंद्र यांचा सामंजस्य करार 2023.24 या शैक्षणिक वर्षापासुन झाला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून इतिहास विभागातील विद्यार्थ्यानी ग्रंथालयास भेट दिली. सुरुवातीला सर्व संशोधक आणि विद्यार्थी यांनी सामूहिक श्रमदान केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ ए. बि.जैन , अतिथी म्हणुन साने गुरुजी ग्रंथालय संचालक मंडळ सचिव श्री प्रकाश वाघ आणि संचालक श्री दिनेश वाल्हे ,कर्मचारी रमेश काका तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ धनंजय चौधरी,सहकारी प्रा. अवीत पाटील, प्रा. प्रसाद मुठे व्यासपीठावर उपस्थित होते. मा. प्राचार्य डॉ जैन सर यांनी संशोधक विद्यार्थ्यांंना या स्वतंत्रता संग्राम काळातील ग्रंथालयाचा उपयोग करून उत्तम संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन केले. संशोधनासाठी प्रेरणा देवून अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्यात. श्री प्रकाश वाघ यांनी ग्रंथालय दैनंदिन कामकाज, पुस्तकांच्या दर्जाचा आणि स्पर्धा परीक्षा मंडळाच्या माध्यामातून मंडळाच्या सेवा कार्याचा उल्लेख केला. संशोधक विद्यार्थ्यांंना प्रताप कॉलेज आय कार्ड दाखवून मोफत अभ्यास करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी प्रेरणा दिली. तर श्री दिनेश वाल्हे यांनी ग्रंथालयात साने गुरुजी यांचे हस्तलिखित तसेच दुर्मिळ पुस्तके याची माहिती दिली. श्री रमेश काका आणि इतर कर्मचारी यांनी सर्व सहकार्य केले. 100 वर्षा पूर्वीच्या इमारतीचे बांधकाम आणि कामकाज पद्धतीचे अवलोकन विद्यार्थ्यांना करता आले. माहिती देताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ग्रंथालय कडून सर्व विद्यार्थ्यांना चहापान व्यवस्था करण्यात आली. सामंजस्य करारामुळे यापुढे प्रताप कॉलेज आणि साने गुरुजी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय मध्ये विद्यार्थी वाचक संख्या वाढण्यासाठी विशेष कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यासाठी देखील चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला इतिहास विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक यांनी उपस्थिती देवून श्रमदान करून दुर्मिळ पुस्तकांचे अवलोकन बाबत विशेष कार्य केले.
प्रा. अवीत पाटील यांनी आभार व्यक्त केले.