June 29, 2025 11:31 pm

प्रताप महाविद्यालयात “उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप” या विषयावर व्याख्यान संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रताप महाविद्यालयात “उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप” या विषयावर व्याख्यान संपन्न.

 

अमळनेर: विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप” या विषयावर एक दिवसीय अतिथी व्याख्यान दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानासाठी, अतिथी व्याख्याता म्हणून मुंबई येथील श्री. दीपक करंजीकर उपस्थित होते. श्री. करंजीकर हे एक बहुआयामी व्यक्ति असून ते प्रख्यात व्यवस्थापन निपुण, लेखक, सामाजिक-आर्थिक तज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन निपुण आणि प्रगल्भ वक्ते आहेत. सरांना ६० पेक्षा अधिक देशांतील, सीनियर लेव्हल मॅनेजमेंट आणि बिझनेस कन्सल्टेशनसह वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीचा 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सरांनी जागतिक स्तरावर युरोप, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि यूएसएसाठी क्रॉस फंक्शनल संघांचे नेतृत्व केले आहे.

अतिथींचे स्वागत खांदेश शिक्षण मंडळांचे कार्योपाध्यक्ष श्री. निरजजी अग्रवाल यांनी केले. प्रा. प्रतिक्षा शर्मा यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रस्तुत व्याख्यानात श्री. दीपक करंजीकर यांनी उद्यमशीलता आणि नवनवीन व्यवसायांचे स्टार्ट अप या विषयी मुलांना मौलिक मार्गदर्शन केले. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाशी वर्तमानाची सांगड घालत उद्यमशिलता व भविष्यातील संधी या विषयावर विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधले. सदर कार्यक्रमासाठी बी. एस्सी, एम. एस्सी, बी. सी. ए., तसेच कॉमर्स शाखेचे चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. धीरज वैष्णव, श्री. दत्ताजी नाईक, डॉ. मुकेश भोळे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी प्रा. पुष्पा पाटील, प्रा. अमित शिंदे, प्रा. सुधाकर बाविस्कर, श्री. दीपक चौधरी तसेच संगणकशास्त्र विभाग व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!