परिस्थिती बदलली म्हणून माणसाने बदलू नये तर जुन्या ऋणानुबंधात कायम राहावे.. मा.प्रविणभैय्या माने
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शेटफळगढे येथील नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांच्या उस्फुर्त प्रतिसादाने सुरवात झाली. शेटफळगढे येथील श्री नागेश्वर मंदिरात सकाळी दहा ते पाच या वेळेत ९३५ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली. यातील ६४२ नागरिकांना विविध नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले ,तर १६ नागरिकांची पुणे येथील भारती विद्यापीठ मध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमा वेळी गावातील विविध नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रवीण भैय्या माने आणि सोनाई परिवार यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली याचबरोबर या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रवीण भैय्या माने यांनी सांगितले की,” शेटफळगडे आणि माने परिवार यांचे जुने ऋणानुबंध आहेत” यामुळे त्यांचे वडील माने दादा यांच्या मनात या गावाविषयी एक वेगळीच आपुलकी आहे.कारण या गावाने त्यांना शिक्षण त्याचबरोबर गोरगरिबांची सेवा करण्याची संधी आणि भविष्यातील मोठेपणा दिला आहे . याच बरोबरच त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राजकीय समाचार देखील घेतला कारण ही कामे फक्त निवडणूक तोंडासमोर घेऊनच ते करत नाहीत तर गोरगरीब तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या विषयी असणारी तळमळ आणि त्यांचे प्रेम हे जर मिळालं तर त्यांना पुढे जाण्यापासून कोणीही रोखणार नाही, कारण माणसं नेहमी त्याच व्यक्तीला लक्षात ठेवतात ज्या व्यक्तीने त्यांच्यासाठी काहीतरी केले आहे असे म्हणत त्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना इंदापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यापुढेही हे शिबिर इतर गावांमध्ये चालू राहील असेही प्रतिपादन केले . या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठीं विशेष सहकार्य सुरज मचाले, गजानन पिसाळ, प्रीतम अवचट, विनोद शिंदे, निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, डॉ. शरद शिर्के, डॉ. तमन्ना मॅडम, डॉ. रणवरे, डॉ. शेख यांनी केले .या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील हनुमंत (अण्णा)वाबळे, लक्ष्मण तात्या साळुंखे, अमोल मचाले, दादा थोरात, शिवाजी मचाले, आकाश बंडगर, रघुनाथ वाबळे, हेमंत सवाणे, भगवान खारतोडे, बाळासो वाबळे, प्रकाश वाबळे, सुरेश गुरव, नारायण मचाले, महादेव झगडे, पोपट मचाले, अमोल झगडे, स्वप्निल वाबळे, शिवाजी जगताप, दिलावर तांबोळी, दादा जाधव, पोपट भगत, सचिन साळुंखे, प्रदीप मत्रे, बाळा सवाणे आदी उपस्थित होते. यावेळी गावातील ग्रामस्थांनी माने परिवाराचे मनापासुन आभार मानले.