आय एस ओ प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राजेगावात मसाले निर्मिती प्रशिक्षण संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

आय एस ओ प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राजेगावात मसाले निर्मिती प्रशिक्षण संपन्न

(निलेश गायकवाड)

ग्रामपंचायत राजेगाव यांच्यावतीने 15 वित्त आयोग निधी अंतर्गत महिलांसाठी 3 दिवसीय मसाले निर्मिती प्रशिक्षण राबविण्यात आले होते हे प्रशिक्षण आयएसओ प्रमाणित स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पार पडले. या प्रशिक्षणामध्ये महिलांना काळा मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, मटण मसाला, चहा मसाला, पनीर मसाला,गरम मसाला, हिरवं वाटण मसाला इत्यादी मसाले शिकविले व त्यांच्या कडून बनवून घेतले तसेच मसाला निर्मिती उद्योग उभा करण्यासाठी शासकीय योजनांची व विविध प्रकारच्या कर्ज प्रकरणांची माहिती या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली.40 प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणामध्ये आपला सहभाग नोंदविला होता.यावेळी प्रशिक्षक श्री तानाजी माटे सर व संस्थेचे अध्यक्ष सुरज सोट पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच ललिता चोपडे,विठ्ठल दूध संकलन केंद्राचे अध्यक्ष सोपान काका चोपडे ग्रामसेवक ए.एच.पवणे भाऊसाहेब, संस्थेचे सचिव धिरज सोट पाटील,निलेश चोपडे, सुजित चोपडे उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!