शेटफळगढे’करांचा नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
(निलेश गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रविण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास शेटफळगढे व परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. शेटफळगढे नागेश्वर मंदिर येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत ९३५ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ६४२ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १६ नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शेटफळगढे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सुरज मचाले, गजानन पिसाळ, प्रीतम अवचट, विनोद शिंदे, निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, डॉ. शरद शिर्के, डॉ. तमन्ना मॅडम, डॉ. रणवरे, डॉ. शेख यांनी आयोजन केले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने हनुमंत आण्णा वाभळे, लक्ष्मण तात्या साळुंखे, अमोल मचाले, दादा थोरात, शिवाजी मचाले, आकाश बंडगर, रघुनाथ वाबळे, हेमंत सवाणे, भगवान खारतोडे, बाळासो वाबळे, प्रकाश वाबळे, सुरेश गुरव, नारायण मचाले, महादेव झगडे, पोपट मचाले, अमोल झगडे, स्वप्निल वाबळे, शिवाजी जगताप, दिलावर तांबोळी, दादा जाधव, पोपट भगत, सचिन साळुंखे, प्रदीप मात्रे, बाळा सवाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.