अमळनेर पोलीस स्टेशन येथे दाखल छेडखानीच्या गुन्ह्यात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर येथे अटकपूर्व जामीन मंजूर
बोगस दिव्यांग प्रमानपत्राबाबत हायकोर्टात स्वतंत्र याचिका दाखल करणार.
अमळनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये सुधारित फौजदारी कायदा, 2023 अंतर्गत दाखल गुन्ह्यात माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने अटकपूर्व अंतरिम जामीन दिला आहे. सविस्तर वृत्त असे की अमळनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये सुधारित फौजदारी कायद्याअंतर्गत अर्जदार यांच्या विरुद्ध छेडछाडीच्या आरोपावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. प्रकरणात पूर्वी तक्रारदार महिला ही खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेऊन त्याचा लाभ घेत असल्याबाबत अर्जदार यांच्यातर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरील बाब ही शासकीय कार्यालयीन चौकशी दरम्यान सिद्ध ही झाली तरी शासकीय कार्यालयाने सदरील महिलेविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही, असे असताना तथाकतिथ दिव्यांग महिलेनेच अर्जदार यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा नोंद केला होता. त्यामध्ये अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी अर्जदार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता. प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने प्रकरणात आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन दिला आहे. प्रकरणात खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत स्वतंत्र याचिका दाखल करणार असल्याचे ॲड. साळोक यांनी सांगितले. प्रकरणातील आरोपीतांतर्फे ॲड. अमोल साळोक, ॲड. मोहित मालपाणी व ॲड. वैभव करंडे यांनी काम पाहिले.