June 29, 2025 12:51 pm

बोराडी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधून अधिकारी झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी ते अधिकारी यांना कर्मवीर पुरस्कार -२०२४…

अपनी भाषा में पढ़े! Translate

बोराडी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधून अधिकारी झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी ते अधिकारी यांना कर्मवीर पुरस्कार -२०२४…

बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) कर्मवीर बाबांनी या शिरपूर तालुक्यात गेल्या ७० ते ७५ वर्षांपूर्वी शिक्षणिक दालन उभं केलेलं. यामध्ये गरीब असो या श्रीमंत त्यांना एकाच छताखाली शिक्षण घेण्याची संधी एकमेव बाबांनीच उपलब्ध करून करून दिले व ह्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करून मोठ्या पदांवर आज अधिकारी म्हणून काम करीत आहे ही गावासाठी व संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. आपण उच्च शिक्षण घेऊन जगभरात कुठेही गेलात तर आपल्या गावाची नाड आपल्या गावासाठी आपल्याला काय करता येईल. आपण ज्या गावात ज्या शाळेत शिकलो व तेथील विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल या सर्व गोष्टींचा ध्यास तुमच्या डोक्यात आला पाहिजे तुमच्या मनात राहिला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आपण केल्याचे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी बोराडी येथे आयोजित दसरा सिमोल्लंघन मेळाव्याचा निमित्ताने बोराडी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधून अधिकारी झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी ते अधिकारी यांना कर्मवीर पुरस्कार -२०२४ देताना बोलत होते.
बोराडी येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर दसरा सिमोल्लंघन मेळाव्याच्या निमित्ताने बोराडी शैक्षणिक संकुलातील किसान विद्या प्रसारक संस्थेतून शिक्षण घेऊन ध्येय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांमधून अधिकारी झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी ते अधिकारी यांना कर्मवीर पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात आले. ह्यात डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, प्राध्यापक व इतर ठिकाणी अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांना डोक्यावर फेटा बांधून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मानचिन्ह, ट्रॉफी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा भव्य गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ तुषार रंधे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळेस किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सचिव निशांत रंधे, आत्मनिर्भर अभियान संघटनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, शिरपूर सिसाकाचे माजी संचालक साहेबराव पाटील,मुंबई क्राईम ब्रँच चे उपनिरीक्षक संदीप पाटील, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.भास्कर पाटील, शालिक पाटील,सरपंच सुखदेव भिल, माजी प्राचार्य बी.डी. पाटील, डॉ.दिलीप पाटील, संस्थेच्या विश्वस्त शामकांत पाटील, माजी उपसरपंच मगन महाजन,विश्वस्त रोहित रंधे,धुळे नंदुरबार ग.स. बँकेचे संचालक शशांक रंधे, यांच्यासह गावातील नागरिक, महिला व नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या ८० वर्षापासून दसरा सिमोल्लंघन कार्यक्रमांची परंपरा असून या निमित्ताने आपट्याच्या झाडाची पूजा डॉक्टर भास्कर पाटील यांच्या हस्ते पुरोहित बिंदू महाराज यांनी केली. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बोराडी ग्रामपंचायतचे उपसरपंच राहुल रंधे यांनी सांगितले की, आपण दरवर्षी दसरा मेळावा निमित्ताने नवनवीन उपक्रम व संकल्पना राबवीत असतो. यावर्षी आगळीवेगळी संकल्पना राबून गावातील विद्यार्थी ते अधिकारी यांना गावाची आठवण राहावी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे गावाचा विकासासाठी आपण नवीन ग्रामसचिवालय उभारणार आहोत. तसेच श्रीसती माता भक्त निवास व आदी कामांचे भूमिपूजन देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ.तुषार रंधे पुढे म्हणाले की, आदिवासी भागातील पहिले आयुर्वेदिक महाविद्यालय संलग्न लिलाई हॉस्पिटल उभारण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्याच्या महात्मा फुले योजनेचे अंतर्गत तेरा हजार आजारांवर मोफत उपचार केला जाणार आहे. व मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहे. आपल्याकडे फक्त पिवळे रेशन कार्ड असेल किंवा दारिद्रेशन कार्ड असेल या आजारावर आपल्या आधारावर आधार नंबरवर आपल्या सर्व उपचार मोफत होणार असल्याचे डॉ. तुषार रंधे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी बोराडी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांमधून अधिकारी झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी ते अधिकारी यांना कर्मवीर पुरस्कार -२०२४ साठी सतीश राजेंद्र पावरा,कविता कैलास भील,यश रवींद्र पवार, युक्ता सुनील बडगुजर,सपना कैलास गोसावी,भावेश किशोर पाटील,लोकेश दिनेश बडगुजर, मानसी अनिल बडगुजर,वैष्णवी अंबादास सगरे,नंदिनी सुरेश पवार,पोलीस निरीक्षक संदिप पाटील,डॉ. राहुल रामेश्वर पावरा,मयंक संदीप चौधरी,डॉ. हर्षल दीपक बोरसे,डॉ. रूपाली धुडकू पाटील,चैताली उदय पवार,डाॅ.शुभांगी रामदास गुजर,डाॅ.मानसी किशोर भदाणे,डाॅ.कविता निंबा बडगुजर,डाॅ.शबनम सलिमोद्दीन काझी या पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय व मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची संकल्पना किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांनी साकारली होती. सुत्रसंचालन संदिप चौधरी यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!