पुणे जिल्ह्यातील नीरा नरसिंहपूर येथील प्रगतशील बागायतदार अभिमन्यू अर्जुन पावशे यांची केळी इराक मध्ये जाणार.
पिंपरी बुद्रुक
दिनांक- 11/१०/२०२३
प्रतिनिधी: समाधान रजपूत.
प्रगतशील बागायतदार अभिमन्यू अर्जुन पावशे (नीरा नरसिंहपुर, तालुका इंदापूर) यांच्या केळीला प्रति किलो 28 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. एक्सपोर्ट केळी इराकला जाणार आहेत.
अभिमन्यू पावसे यांनी आपल्या प्लॉटचे कटिंग होत असताना हलगी, संबळ, वाद्य लावून स्वागत केले. 20 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी 4000 रोपांची तीन एकरात लागवड केली होती. यावर्षी उन्हाळ्यात 45 प्लस टेंपरेचरमुळे त्यांना खूप संकटांना सामोरे जावे लागले .परंतु जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सर्व संकटांवर मात करत तीन एकरामध्ये 100 टन उत्पादन अपेक्षित आहे आणि आजच्या दराचा विचार केला तर तीस लाख रुपयांचे उत्पादन त्यांना मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आदर्श आहे. प्रगतशील बागायतदार अभिमन्यू पावशे यांनी सांगितले की , बागायती पट्ट्यामध्ये सलग 35 वर्षापासून ऊस शेती केली जात आहे . याचा विपरीत परिणाम असा झाला आहे की शेतीचा कस व पोत कमी झाला आहे. आपल्या शेतात फेरपालट करणे आवश्यक आहे व ऊस शेती आता पहिल्यासारखी परवडत नाही. त्यामुळे ऊस शेतीला पर्याय म्हणून आपण केळी लागवड केली पाहिजे. पावशे यांनी केळी प्लॉट साठी मार्गदर्शन हे अंकुर कृषी सेवा केंद्र गिरवीचे मालक विनोद माने यांच्याकडून घेतले . यावेळी प्रगतशील बागायतदार व ग्रामपंचायत सदस्य किशोर तात्या मोहिते, प्रसिद्ध उद्योगपती बाळासाहेब पंधे, डॉक्टर संदीप केसकर, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर प्रकाश मोहिते , प्रगतशील बागायतदार पंडित नाना ताटे, माजी सरपंच बंडू काका ताटे , संतोष ताटे, विलास पराडे, जनार्दन मोहिते, विलास ताटे, नाथाजी मोहिते , संतोष मोरे , समीर मोहिते, रमेश इंगळे , मिनिनाथ क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, राहुल डीसले, चंद्रकांत क्षीरसागर, महेश कोरे , लक्ष्मण कांबळे, महेश मोहपरकर, मारुती शिंदे, संजय पावशे, शहाजी पावशे, दीपक पावशे, नागेश पावशे, नितीन पावशे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी अभिमन्यू अर्जुन पावशे यांचे इंदापूर तालुक्यातून कौतुक होत आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा मिळत आहेत . अभिमन्यू अर्जुन पावशे हे पंचक्रोशी मध्ये एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्याच्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन घ्यायचे असेल तर अभिमन्यू अर्जुन पावसे (9970558186) यांच्याशी संपर्क करावा.