June 29, 2025 3:27 am

मंत्री अनिल पाटील यांना आमच्या समाजाचा पाठिंबा मुळीच नाही.

अपनी भाषा में पढ़े! Translate

मंत्री अनिल पाटील यांना आमच्या समाजाचा पाठिंबा मुळीच नाही. नरेश दामोदर कांबळे शहराध्यक्ष चर्मकार समाज अमळनेर

 

अमळनेर विकी जाधव 

अवघ्या दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असून “जणू मीच पुन्हा आमदार होणार”. असे स्वप्न आमदार. मंत्री अनिल पाटील यांना पडू लागले आहे. आपण लोकशाहीत आहोत. असा त्यांना विसर पडला असेल का? 

“निव्वळ पैशाच्या जोरावर विकत घेऊ” अशी मानसिकता ठेवून निवडणूक लढवणार असाल तर खबरदार.  महोदय विधानसभेच्या मैदानात आपण चित_पट_व्हाल… 

चर्मकार समाज हा स्वाभिमानी आणि कष्ट करून जीवन जगणारा समाज असून चर्मकार समाज मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा देणार नाही. आमची अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उठ सुठ काही ही खोट्या बातम्या प्रसिद्ध करायच्या समाजात दोन गट निर्माण करायचे हे योग्य नाही. याने आपले पुनर्वसन होणार का ?? 

नुकतीच अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघा चा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठिंबा. मिळाला. अश्या आशयाच्या बातम्या अमळनेर शहरात फिरू लागल्या असून मंत्री अनिल पाटील हे समाजासमाजात दोन गट निर्माण करून सोड बुद्धीचे राजकारण निर्माण करत आहे. मंत्री अनिल पाटील यांचे येत्या विधानसभा निवडणुकीत पुनर्वसन होणार नाही.

चर्मकार महासंघाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की आशी कोणत्याही प्रकारची आमची बैठक झालेली नाही चर्मकार समाज हा स्वाभिमानी समाज असून कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला भीक घालत नाही.

मंत्री अनिल पाटील यांना भेटणारे त्यांचेच काही कार्यकर्ते असून सोबत काही चर्मकार समाजातील तरुण देखील होते. याचाच अर्थ असा नाहीं की संपूर्ण चर्मकार समाजाणे आपणास पाठींबा दिला?.

समाजाच्या वरिष्ठांची कोणताही प्रकारचा संपर्क केला नसून परस्पर मंत्री अनिल पाटील यांना पाठिंबा कोणी दिला ते एका गल्लीतील व्यवसायिक लोक असून संपूर्ण चर्मकार समाज होता का असा ही प्रश्न आहे.

आम्ही चर्मकार समाज म्हणून मंत्री अनिल पाटील यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबात दिलेला नाही. असे महा राष्ट्रीय चर्मकार संघ महाराष्ट्र राज्याचे नरेश दामोदर कांबळे अध्यक्ष चर्मकार समाज अमळनेर यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. 

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!