करमाळा(प्रतिनिधी)- महेश चिवटे ही व्यक्ती सध्या त्याचा
धाकटा भाऊ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ओएसडी
असल्याने व गेल्या बऱ्याच वर्षांपासून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कामाला असल्याने याचा गैरफायदा घेऊन व या सत्तेच्या जीवावर स्थानिक पातळीवर अनेक लोकांना वेळोवेळी त्रास देत असून या उपद्रवाची पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चिवटेविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व या उपद्रवाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी करमाळा शहर,श्री देवीचा माळ व परिसरातील नागरिकांकडून एका निवेदनाद्वारे करमाळा पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,तहसीलदार करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.
या निवेदनात असे म्हंटले आहे की,देवीचा माळ रस्त्यावर किरकोळ धंदे करून उपजीविका करणारे गरीब,गरजू भाजीविक्रेते,टपरीधारक यांच्याविरुद्ध सतत तक्रारी करून त्यांना त्रास देणे,विरोध करणारांविरुद्ध पोलिसांकडे खोट्या तक्रारी करणे,ओएसडी असलेल्या भावाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनावर दबाव आणून सर्वसामान्य लोकांना त्रास देणे अशा प्रकारांमुळे करमाळा परिसरातील रहिवाशांमध्ये चिवटेविषयी तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झालेला आहे.तेव्हा याचा त्वरित बंदोबस्त व्हावा अन्यथा या प्रश्नी सामाजिक, सामूहिक उद्रेक होईल असा इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.करमाळा-देवीचा माळ रस्त्याचे गोकुळ हॉस्पिटल ते आयसीआयसीआय बँक कॉर्नर या दरम्यानचे डाम्बरी करणाचे काम चिवटे यानेच गेली दीड वर्षे प्रशासनावर दबाव आणून बंद पाडले होते आणि आता हे काम सुरू झाल्यावर उलटा कांगावा करून बबन व जितेंद्र चांदगुडे हे ठेकेदाराला दमदाटी करून हे काम बंद पाडत असल्याची खोटी तक्रार चिवटेने पोलिसांकडे केली असल्याची तसेच आयसीआयसीआय बँकेशेजारी असलेल्या त्याच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या बोअरवेलचे पाणी वारंवार रस्त्यावर सोडून या परिसरातील भाजीविक्रेत्यांना त्रास देणे तसेच या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करून रस्त्यावर येणारे हे पाणी गटारीचे असल्याचा आभास निर्माण करून नागरिकांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींविषयी गैरसमज निर्माण करण्याचे दुष्कृत्य करत असल्याची माहिती प्रवीण हिरगुडे,बबन चांदगुडे, शिवाजी माने,अंगद बिडवे,अमोल सावंत आदी कार्यकर्त्यांनी दिली आहे.