June 29, 2025 8:12 am

राजवर्धन पाटलांकडून अधिकृत घोषणा;हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश निश्चित….७ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर मध्ये पक्ष प्रवेशाचे संकेत

अपनी भाषा में पढ़े! Translate

राजवर्धन पाटलांकडून अधिकृत घोषणा;हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश निश्चित….७ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर मध्ये पक्ष प्रवेशाचे संकेत

(निलेश गायकवाड)

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र व निरा भिमा सहकारी साखर कारखाने संचालक राजवर्धन पाटील यांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचे स्टेटस ठेवल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे लवकरच राष्ट्रवादी (sp) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर झाले आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटी वेळी स्वतः अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या.

तसेच हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली असून ७ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत इंदापूर मध्ये पक्ष प्रवेशाचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे प्रवेश करणार हे अनेक दिवसापासून चर्चा होती मात्र पाटील यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांनी चर्चेला पूर्णविराम दिला असून त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचे आता समोर येत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!