June 30, 2025 11:51 am

प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून भिगवन येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून
भिगवन येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर.

(निलेश गायकवाड)

भिगवन :- रविवार (दि.२९सप्टेंबर २०२४) भिगवन येथे पुणे जिल्हा परिषदेचे मा. सदस्य प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये ग्रामपंचायत कार्यालय भिगवन या ठिकाणी होणार आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आप्पासहेब गायकवाड यांनी असे आवाहन केले आहे.
मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य व्यक्तींना नवी दृष्टी प्रदान करण्याचा एक संकल्प प्रवीण माने यांनी हाती घेतला आहे. भिगवन आणि परिसरातील ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे तसेच ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना भारती हॉस्पिटल पुणे येथे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.रुग्णांची तपासणी, रुग्णांना मोफत चष्मे, तसेच पुणे येथे येण्या जाण्याचा तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च प्रवीण माने करणार आहेत. तर रुग्णांनी दादासाहेब थोरात, आप्पासाहेब गायकवाड,पंकज काशीद,प्रसाद जगताप यांच्याशी संपर्क करावा आणि मोफत उपचार करुन घ्यावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!