June 30, 2025 11:57 am

राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल….

अपनी भाषा में पढ़े! Translate

राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल….

(सनत वाढई)

नागपूर : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून नागपूरच्या वैष्णवी हरिभाऊ बावस्कर यांनी मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. पालघरच्या अमित मोतीराम भोये यांनी अनुसूचित जमाती प्रवर्गातून चौथा क्रमांक मिळविला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ साली गट अ आणि गट ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम

ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. विविध न्यायालयात, न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. वैष्णवी बावस्कर यांची सहा महिन्यांपूर्वी मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली होती. गुरुवारी जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेतही त्यांनी बाजी मारली असून आता त्यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

आर्थिक परिस्थितीशी झगडून यश

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून वैष्णवी यांनी हे यश मिळवल्याचे त्यांचे मार्गदर्शक विशाल नागपुरे यांनी ‘मार्मिक समाचार ला सांगितले. २०१९ ला त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. आई एका खासगी रुग्णालयात कामाला होती. वैष्णवी यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या कठोर परिश्रमाचे चीज झाले आहे.

या तिच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्थरातून तिचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे …. वैष्णवी बावस्कर हिस तिच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या सनत वाढई -कार्याध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ महाराष्ट्र प्रदेश..

 

https://x.com/Dev_Fadnavis/status/1839873890752889186

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!