शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रा. बापूराव जाधव सर यांना समाजभूषण पुरस्कार प्रधान करण्यात आला.
पिंपरी बुद्रुक :
दिनांक- 28/09/2024
प्रतिनिधी: समाधान रजपूत .
पिंपरी चिंचवड येथे पिंपळे गुरव मधील निळू फुले नाट्यगृहामध्ये दिनांक 22/09/2024 रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती व जनसंवाद यात्रेचे आयोजन केलेले होते. या कार्यक्रमांमध्ये सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. बापुराव सोपान जाधव सर यांना “जय मल्हार क्रांती संघटनेचे ” संस्थापक- अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे, श्री पी एल खंडागळे साहेब ,सहकार आयुक्त व उद्योजक मा. श्री रोहिदास दादा मदने यांच्या हस्ते “समाजभूषण” पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमासाठी राज्यभरातून जय मल्हार क्रांती संघटनेचे अधिकारी, पदाधिकारी, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक व मोठ्या प्रमाणात संघटनेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करून प्राध्यापक बापूराव जाधव सर यांनी अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या मोठ्या पदावरती पाठवले आहे. तसेच त्यांचे शैक्षणिक कार्य हे अतिशय अनमोल आहे म्हणूनच हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरामधून त्यांचे कौतुक होत आहे व त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.