न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

करमाळयातील शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी धर्मवीर 2 हा चित्रपट मोफत पाहता येणार – निखील चांदगुडे, युवा सेना जिल्हा समन्वयक

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकारी यांना दि.27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर 2 हा सिनेमा मोफत दाखविणार असल्याचे युवा सेना जिल्हा समन्वयक निखील चांदगुडे यांनी सांगितले. करमाळा येथे शिवसेना शाखा प्रमुखांचा मेळावा या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळयातील शिवसेनेची वाटचाल चालू असून धर्मवीर 2 या चित्रपट प्रदर्शना दिवशी  शहरातून बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यां विचारांचा वारसा मुख्यमंत्री शिंदे हे चालवित असून डान्स बार असो अथवा बदलापूर सारखी घटना असो तात्काळ अशा नराधमांना शिक्षा होणेसाठी संवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत. यावेळी बदलापूरच्या घटनेबाबत विरोधक करीत असलेले राजकारण निंदनीय असून त्याचा निषेधही यावेळी चांदगुडे यांनी भर मेळाव्यात केला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!