न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

नीरा नरसिंहपूर येथे गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला

अपनी भाषा में पढ़े! Translate

नीरा नरसिंहपूर येथे गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाला
– हर्षवर्धन पाटील यांचेकडून शोध कार्यासाठी सूचना
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे. दि.18/9/24
श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथे नीरा नदी पात्रात श्री गणेश विसर्जनासाठी गेलेला मुलगा बुडाल्याची घटना मंगळवारी (दि.17) दुपारी घडली. अनिकेत विनायक कुलकर्णी ( वय – 16 वर्षे, रा. परांडा तालुका) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. सदरची घटना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दुपारी समजतात तात्काळ यांनी प्रशासनाशी संपर्क साधून, दुर्दैवी मुलाच्या युद्धपातळीवर शोधकार्यासाठी सूचना प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. इंदापूरचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक, घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नीरा नरसिंहपूर येथे वेद अध्यायन शिकविणाऱ्या पाठशाळेत अनिकेत कुलकर्णी हा शिकत होता. गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात तो इतर मुलांसह गेला असता सदरची दुर्दैवी घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल होत असून, होडीतून व पाण्यात बुड्या घेऊन सदर मुलाच्या सध्या शोध घेतला जात आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या दुर्दैवी घटने संदर्भात बारामतीचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी व स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मदत कार्याच्या सूचना दिल्या आहेत. या दुर्दैव घटनेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!